विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतून 10 मिनिटांत एक्झिट घेतली. ते लातूरला नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी निघून गेले मात्र त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती या संदर्भातला खुलासा स्वतः अजितदादांनीच नंतर केला. Ajit Pawar exited within 10 minutes from the last cabinet meeting
मात्र या दरम्यान अजितदादा नाराज असल्याच्या बातम्यांचे उपयोग फुटले. मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत 80 निर्णय घेतले गेले. हे सगळे निर्णय राज्याच्या तिजोरीवर भार पाडणारे आहेत म्हणून अजितदादा नाराज झाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रने सूत्रांच्या हवाल्याने दिली. त्यावरून अजितदादांच्या नाराजीचे पतंग विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उडविले. अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा डाव सुरू आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय अजितदादांना मान्य नसल्यामुळे ते 10 मिनिटांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून गेले, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. यानिमित्ताने महायुतीमध्ये मोठा बेबनाव तयार झाल्याचे चित्र माध्यमांच्या बातम्यांमधून तयार केले गेले.
मात्र, या संदर्भात खरे सवाल कोणीच विचारले नाहीत. अजितदादा जर महायुतीच्या मंत्रिमंडळावर नाराज होऊन 10 मिनिटात निघून गेले, तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे 8 मंत्री त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत का हजर ठेवले होते?? छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीचे अन्य मंत्री अजितदादांबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीतून का बाहेर पडले नाहीत?? महायुतीच्या मंत्रिमंडळात अजितदादा नाराज असतील, तरी बाकीचे मंत्री नाराज नाहीत म्हणून ते निघून गेले नाहीत का??, की अजितदादांनी कोणती स्ट्रॅटेजी करून उरलेले राष्ट्रवादीचे सगळे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर ठेवून तिथे त्यांनी “हेरगिरी” करावी, असे सांगून ते निघून गेले होते?? याविषयी कुठल्याच माध्यमांनी कुठलाही चकार शब्द काढला नाही.
खुद्द अजितदादांनी लातूरच्या नियोजित कार्यक्रमाचा उल्लेख करून खुलासा केला तरी अजितदादा नाराज असल्याच्या बातम्यांच्या पुड्या माध्यमांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी सोडत ठेवल्या.
Ajit Pawar exited within 10 minutes from the last cabinet meeting
महत्वाच्या बातम्या
- महायुती सरकारचे विक्रमी 80 निर्णय; नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 वरून 15 लाख, पत्रकारांसाठी महामंडळाची घोषणा
- Cocaine : स्नॅक्सच्या पॅकेटमध्ये आढळले तब्बल 2000 कोटींचे कोकेन!
- Radhaswami maharaj राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!
- Himanta Biswa Sarma : हरियाणातील काँग्रेसच्या पराभवावर हिमंता बिस्वा सरमा यांनी लगावला टोला, म्हणाले…