प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घर फुटले वयाच्या 83 व्या वर्षी त्यांच्या पुतण्यानेच त्यांच्या राजकारणाचे पोस्टमार्टम केले. साहेब बस्स झाले. आता हट्ट सोडा. आतातरी थांबा… किती दिवस चालणार?? अशा शब्दांत अजितदादांनी शरद पवारांच्या दिशेने एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट केले शरद पवारांच्या राजकारणाचा एकही मुद्दा अजितदादांनी सोडला नाही गेल्या 40 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातला जीवनातले शरद पवारांविरुद्धची सर्व भडास अजितदादांनी एकाच भाषणात काढून टाकली. शरद पवारांनी आपल्याच राजकीय धरसोड वृत्तीतून आणि कच खाऊ धोरणातून वयाच्या 83 व्या वर्षी देखील सन्मानाने निवृत्त होण्याची संधी गमावली. Ajit Dada blasts one after the other on the 83-year-old warrior!!
राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा नव्हे तर तीन वेळा भाजपसोबत जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. अजित पवार यांनी आजच्या भाषणातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पोलखोल केली. तसेच शरद पवार यांच्या राजकारणातील धरसोडवृत्ती आणि कचखाऊ वृत्तीवरही कठोर भाष्य केले. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी शरद पवार हे माझं आजही दैवत आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
मधल्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला नको होतं. ती संधी घ्यायला हवी होती. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता, असं अजित पवार म्हणाले.
‘’अजित पवारांचे विचार वेगळे आणि आमचे वेगळे, जे काही घडले ते…’’ सुप्रिया सुळेंचं माध्यमांसमोर विधान!
माझी प्रतिमा दबंग
मंत्रिमंडळात नऊ जणांना संधी मिळाली आहे. अजून मंत्रीपद मिळणार आहे. अजूनही पालकमंत्रीपद मिळणार आहे. आपल्या विकास कामांना स्थगिती मिळाली होती, ती स्थगिती उठवायची आहे. विविध कारणाने आमदार आले नाही. मी कधीच भेदभाव केला नाही. उद्याही काम करण्यासाठी भेदभाव करणार नाही. भाजप आणि शिंदेगटांना सांगायचं की माझी प्रतिमा दबंग नेता, कडक नेता अशी झाली आहे. पण मी तसं होऊ देणार नाही. मी मुस्लिम, मागासवर्गीय आणि सर्वांना समान लेखणार आहे. विरोधात बसून विकासाला पोषक काम करता येत नाही, असं त्यांनी सांगितलं.
पवारांची औलाद ठरणार नाही
2017 काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी 2014ला आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आम्ही बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण नेत्याचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. आम्ही गेलो. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. त्यांनी आमची विचारपूस केली. भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? शपथविधीला का पाठवलं? 2017ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे हे लोक होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं… मी कधीही खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद ठरणार नाही, असं ते म्हणाले.
भाजप शिवसेनेला सोडायला तयार नव्हती
त्यानंतर सुनील तटकरेंना दिल्लीला बोलावलं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि तटकरे यांची बैठक झाली. भाजपने सांगितलं शिवसेना आमचा 25 वर्ष जुना मित्र पक्ष आहे. आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. ते म्हणाले, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार राहील. आमचे वरिष्ठ नेते म्हणाले. ते चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे. त्यानंतर बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
मग भाजप कसा जातीयवादी झाला?
त्यानंतर 2019च्या निवडणुकीनंतर एका उद्योगपतीच्या घरी एक चर्चा झाली. पाच बैठका झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठे बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून मी कुठे बोललो ना्ही. त्यानंतर अचानक बदल झाला. आम्हाला सांगितलं आपण शिवसेनेसोबत जायचं. 2017ला शिवसेना जातीयवादी होता. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही, असंही ते म्हणाले.
तेव्हाही सांगितलं
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधी हूँ की चूँ केलं नाही. कोरोना काळात काम केलं. त्यात हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितलं काही तरी वेगळं घडतंय. उद्धव ठाकरेंना सांगितलं काही तरी घडतंय. पण कुणी लक्ष दिलं नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले.
Ajit Dada blasts one after the other on the 83-year-old warrior!!
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही