• Download App
    'सिंघम' ची साथ :कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी । Ajay Devgn Joins Hands With BMC And A Hospital To Set Up 20-Bed COVID-19 Facility In Mumbai

    ‘सिंघम’ ची साथ :कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत . महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. अशातच आता सिंघम अजय देवगण देखील लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. Accompanying ‘Singham’: A helping hand for Corona patients; 1 crore given to Mumbai Municipal Corporation

    अजयने मुंबई महानगरपालिकेला तब्बल 1 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुंबई महापालिका आणि हिंदुजा रुग्णालयाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या आयसीयू युनिटच्या उभारणीत अजयने त्याचं योगदान दिलंय. त्याचसोबत त्याने आपल्या मित्रांसोबत 20 आयसीयू बेड्सची व्यवस्थाही केली. अजय देवगणच्या संस्थेच्या माध्यमातून ही रक्कम बीएमसीला देण्यात आली आहे.

    गेल्या वर्षी कोरोनामुळे धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यावेळी अजय देवगणने धारावीसाठी व्हेंटीलेटर उपलब्ध करुन दिले होते.

    दरम्यान अजय पाठोपाठ आता अक्षयकुमार तसंच ट्विंकल खन्नाने मदतीचा हात पुढे केलाय. मुंबईत अक्षयकुमार आणि ट्विंकल मिळून 120 ऑक्सिजन सिलेंडर्सची मदत केलीये. ट्विंकलने याबाबत सोशल मीडियाावरूनही माहिती दिली.

    Ajay Devgn Joins Hands With BMC And A Hospital To Set Up 20-Bed COVID-19 Facility In Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस