• Download App
    सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी...’’ Air Force plane carrying 246 Indians from Sudan reaches Mumbai

    सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी…’’

    सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारचे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू आहे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी (२७ एप्रिल) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, सुदानमधून २४६ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले. यावर अनेक प्रवाशांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. गृहयुद्धाचा सामना करणाऱ्या सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल आरसीएफ यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. Air Force plane carrying 246 Indians from Sudan reaches Mumbai

    सुदानमधून परतलेल्या भारतीयांनी पंतप्रधानांना दिले आशीर्वाद –

    सुदानहून भारतात परतलेली एका वृद्ध महिला प्रवाशी भावूकपणे म्हणाली, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदी हजार वर्षे जगू दे.” त्याचवेळी आणखी एका भारतीय निशा मेहता आणि अवतार सिहं यांनीही पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

    आतापर्यंत किती भारतीय परतले आहेत? –

    यापूर्वी, भारतीय हवाई दलाच्या दोन वाहतूक विमानांद्वारे २५६ भारतीयांना सुदानमधून बाहेर काढण्यात आले होते. INS सुमेधा या नौदलाच्या जहाजातून २७८ भारतीयांना बाहेर काढण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या ७८० झाली आहे.

    विमान मुंबईला रवाना होण्याअगोदर काही मिनिटांपूर्वी, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ट्विट केले होते, “जेद्दाहमधून भारतीयांना वेगाने परत आणण्याचे आमचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. IAF C17 Globemaster द्वारे २४६ भारतीय लवकरच मुंबईत पोहोचतील.’’

    Air Force plane carrying 246 Indians from Sudan reaches Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस