• Download App
    अहमदनगर : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार ' एवढा' दंड ; नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू|Ahmednagar: Violation of Motor Vehicle Act will result in 'so much' penalty; The implementation of the new rules continues

    अहमदनगर : मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागणार ‘ एवढा’ दंड ; नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू

    नगर जिल्ह्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.Ahmednagar: Violation of Motor Vehicle Act will result in ‘so much’ penalty; The implementation of the new rules continues


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : राज्यात नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांना अटकाव करण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्यास नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.



    हे आहेत नवीन नियम

    १)लायसन शिवाय वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे.हा दंड पूर्वी पाचशे रुपये होता.
    )तसेच ट्रिपल सीट ला पूर्वी दोनशे रुपये तर आता एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
    )विनासीट बेल्टला पूर्वी २०० तर आता ५०० रुपये
    )कर्णकर्कश हॉर्न वाजवल्यास पूर्वी २०० रुपये दंड होता तर आता तो १००० करण्यात आला आहे.
    5)तसेच फोर व्हीलरच्या काचेला ब्लॅक फिल्म लावल्यास पूर्वी २०० दंड होता तर नवीन नियमावलीत ५०० दंड असेल.

    वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.भोसले यांनी प्रेस नोट द्वारे माहिती दिली की , इतरही उल्लंघनाच्या प्रकारामध्ये नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी चालू झाल्याची माहिती दिली आहे.तरी नागरिकांनी आता मोटर वाहन चालविताना कायद्याचे व नियमांचे पालन करावे जेणेकरून आपल्याला हा भुर्दंड बसणार नाही असही सांगितले.

    Ahmednagar: Violation of Motor Vehicle Act will result in ‘so much’ penalty; The implementation of the new rules continues

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Eknath Shinde : नकली को किया ढेर, UBT को पता चला कौन असली शेर; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन