प्रतिनिधी
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचे जन्मगाव चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर देवी अहिल्यानगर करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.Ahmadnagar renamed Devi Ahilyanagar shinde fadnavis govt
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. त्याला गोपीचंद पडळकर यांनीदेखील दुजोरा दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
“राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘अहिल्यानगर होणारच’
“आपले हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण छत्रपती शिवरायांचे नाव सांगणारे लोकं आहोत. आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केले, आपण धाराशिव तयार केले. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झाले पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाहीय, असे मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु झाले. यावेळी त्यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे टाळ्यांचा एकच गडगडाट सुरू झाला.
गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी एक मोठी घोषणा
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत बारामती शासकीय मेडिकल कॉलेजचे नामांतर अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज बारामती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआर नुकताच काढण्यात आला. या बाबतची माहिती गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात केली.
Ahmadnagar renamed Devi Ahilyanagar shinde fadnavis govt
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीगीरांचे फक्त दावे, ब्रजभूषण सिंहांच्या विरोधात पुरावेच नाहीत; दिल्ली पोलिसांची माहिती
- तब्बल 53 वर्षांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतातून खळाळणार!!; शिंदे – फडणवीसांच्या हस्ते चाचणी शुभारंभ
- मान्सूनचा वाढला वेग, उद्या केरळमध्ये पोहोचणार; 15 जूनपासून देशातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता
- संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा : सध्याचे संकट काहीच नाही, पाकिस्तानात पुढच्या काही महिन्यांत अन्नाचे दुर्भिक्ष्य आणखी वाढेल