• Download App
    मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!|Against the Halal Parishad to be held in Mumbai, anti-Halal Forced Conference of Hindu organizations on October 9!!

    मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची 9 ऑक्टोबरला हलाल सक्तीविरोधी परिषद!!

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करणारी नियोजित हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे.Against the Halal Parishad to be held in Mumbai, anti-Halal Forced Conference of Hindu organizations on October 9!!

    मुंबईत इस्लामी जिमखान्यावर 12, 13 नोव्हेंबर रोजी हलाल परिषद होणे नियोजित आहे. ब्लोसम इंडिया संस्थेने या परिषदेचे आयोजन केले आहे.



    या हलाल परिषदेला विरोध दर्शवण्यासाठी ९ ऑक्टोबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये सायंकाळी ५.३० वाजता हलाल सक्तीविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदूंनी या परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश शिंदे सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे केले आहे.

    हलाल सक्तीविरोधी परिषदेत पुढील दिशा निश्चित करणार

    या आवाहनामध्ये रमेश शिंदे यांनी म्हटले आहे, ‘मुंबई येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या हलाल परिषदेला हिंदु जनजागृती समितीचा विरोध आहे. यापूर्वी केवळ मांस हलाल करण्याची पद्धत होती. सध्या मात्र इमारत, संकेतस्थळे, मिठाई यांनाही हलाल प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली हिंदु व्यापार्‍यांकडून हजारो कोटी रुपये गोळा केले जात आहेत.

    भारत सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात असतांना खासगी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्रासारख्या समांतर प्रमाणपत्राची आवश्यकता काय? समांतर अर्थव्यवस्था निर्माण करून सरकारला आव्हान देणारी हलाल परिषद या देशात होता कामा नये. मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. या परिषदेच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये हलाल सक्तीविरोधी परिषद आयोजित करून हलाल प्रमाणपत्राच्या विरोधातील पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

    Against the Halal Parishad to be held in Mumbai, anti-Halal Forced Conference of Hindu organizations on October 9!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!