नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे 98 रुग्ण सक्रीय आहेत, ते सर्व गृह विलगीकरणातील आहेत. After two years there is no any corona patients admitted in pune city private and government hospital
विशेष प्रतिनिधी
पुणे : नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे 98 रुग्ण सक्रीय आहेत, ते सर्व गृह विलगीकरणातील आहेत, असी माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने शहरातील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या 10 च्या आत आली आहे. त्यामुळे शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये कोरोना रुग्ण मुक्त झाली. मात्र, शहरातील पहिल्या रुग्णावर उपचार करणार्या महापालिकेच्या नायडू रुग्णालयात शेवटचा रुग्ण उपचार घेत होता. या रुग्णाला बुधवारी घरी सोडण्यात आले. गेल्या महिन्यात 21 मार्चपासून एकच कोरोना बाधित रुग्ण येथे उपचार घेत आहे. त्याला डिस्चार्ज देतो न देतो तोच 1 एप्रिल रोजी आणखी एक दाखल झाला. आता त्यालाही घरी सोडल्याने शहरातील खासगी आणि शासकीय अशा एकाही रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नाही.
पुण्यात पहिला कोरोना रुग्ण 9 मार्च 2020 रोजी सापडला होता. या रुग्णाला महापालिकेच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून नायडू रुग्णालयाने हजारो कोरोना बाधितांना आपल्या कवेत सामावून घेत त्यांच्यावर उपचार करून सुखरुप घरी पाठवले आहे. नायडू रुग्णालयात शहरातील पहिल्या आणि शेवटच्याही रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले.पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण कोरोनाचे १४५२८१५ रुग्ण मिळून आले असून त्यापैकी १४३२०३३ रुग्ण बरे झाले आहे. तर २०५२५ जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून पुणे शहर,पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण याठिकाणी एकूण २५७ रुग्ण सक्रिय आहे.
After two years there is no any corona patients admitted in pune city private and government hospital
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल
- अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
- पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत
- देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू