• Download App
    अडीच वर्षांनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, रामदास आठवले यांचा विश्वास|After two and a half years, Shiv Sena will go with BJP again, believes Ramdas Athavale

    अडीच वर्षांनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, रामदास आठवले यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल. त्यामुळे राज्यात सत्तांतर अटळ आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.After two and a half years, Shiv Sena will go with BJP again, believes Ramdas Athavale

    सांगलीत पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये इतका वाद आहे की कदाचित अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर कदाचित शिवसेना महाविकासआघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत जाऊ शकते. राणेंनी आपली भूमिका मांडली. असं घडेल असं राणेंना वाटतंय. मला वाटतंय की हे सरकार फार काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल. सरकार लवकर जाईल अशी अपेक्षा आहे.



    नारायण राणे यांनीही राज्यात भाजपाचे सरकार येईल असे भाकित वर्तविताना म्हटले होते की, लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. एखादे सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल.

    यावेळी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाईची मागणी करताना आठवले म्हणाले, शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता तिन्ही कायदे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यायला हवं. ते होत नसेल,

    तर राकेश टिकैत आणि इतर नेत्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे. कायदे मागे घेतल्यानंतरही ऊठसूट आंदोलन करणं योग्य नाही. आता आंदोलनाची आवश्यकता नाही. इतर मुद्द्यांवर चचेर्तून मार्ग काढता येऊ शकतो.

    After two and a half years, Shiv Sena will go with BJP again, believes Ramdas Athavale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस