• Download App
    rajendra hagawne वैष्णवी हगवणे प्रकरणात टीकेचा भडीमार झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीला "जाग"; राजेंद्र हगवणे पक्षातून निलंबित!!

    वैष्णवी हगवणे प्रकरणात टीकेचा भडीमार झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीला “जाग”; राजेंद्र हगवणे पक्षातून निलंबित!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात सगळीकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर जाग आली आपल्याला आता पक्षाच्या पदाधिकाऱ्याला निलंबित करावेच लागेल अन्यथा पक्षाची आणखी बदनामी होत राहील, हे लक्षात येताच अजित पवारांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची पक्षातून हकालपट्टी केली. त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करायचे आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी ही माहिती दिली.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुळशी तालुक्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे, त्याचा मुलगा शशांक हागवणे आणि घरातल्या अन्य लोकांनी आपली सून वैष्णवी हगवणे हिचा अनन्वित छळ करून तिचा हुंडाबळी घेतला. त्याच्या विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या राजेंद्र हगवणे याच्या थोरल्या सुनेने देखील त्याने अमानुष मारहाण केल्याची तक्रार केली होती. मात्र राजेंद्र हगवणे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात दबावापोटी कारवाई केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील सुरूवातीला राजेंद्र हगवणे यांच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नव्हती. राज्य महिला आयोगाने सुरुवातीला याप्रकरणी दखल घेतली नव्हती.

    पण वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळी घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सगळीकडून टीकेचा भडीमार व्हायला लागला. अजित पवार आणि रूपाली चाकणकर हेच राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे आणि त्यांच्या परिवाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप व्हायला लागला. त्यामुळे अजितदादांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात गेली. त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला “जाग” आली. अजित पवारांनी काल पुण्याच्या पोलीस आयुक्त यांना फोन करून राजेंद्र हगवणे याच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करायचे आदेश दिले. त्याचबरोबर राजेंद्र हगवणे याला राष्ट्रवादी काँग्रेस मधून निलंबित केले.

    After strong criticism from all sections Ajit Pawar sacks Rajendra Hagawne from NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन- विधानसभेप्रमाणे मनपातही परिवर्तन करा, 5 वर्षांत 20 वर्षांचा बॅकलॉक भरून काढा

    Chagan Bhujbal : छगन भुजबळांनी पालकमंत्रिपदाचा हट्ट सोडला, म्हणाले – सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लागणे महत्त्वाचे

    State Government : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय; वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी, शासन निर्णय जारी