राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला होता.’After seeing the tiger, Nitesh Rane’s meow-meow came out of his mouth’; Kishori Pednekar criticizes Nitesh Rane
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. काल शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात दाखल झाले होताच भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला होता.दरम्यान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले.
भाजप नेते नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’चा आवाज काढला यावरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध चालू आहे. आता शिवसेना देखील आक्रमक झाली आहे.नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’वर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पेडणेकर म्हणाल्या की , ” नितेश राणेंनी जेव्हा म्याव म्यावची प्रतिक्रिया दिली त्यावर आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यावरुनच त्यांचा सुसंस्कृत आणि असंस्कृतपणा तिथे स्पष्ट दिसला. शिवसेनेला वाघ असंच म्हंटल जात. त्यामुळे आदित्या ठाकरेंना पाहून राणेंना भीती वाटली असेल म्हणून त्यांनी पटकन एक प्रतिक्रिया म्याव म्याव दिली असेल तर माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देत किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणेंना सुनावले आहे.
‘After seeing the tiger, Nitesh Rane’s meow-meow came out of his mouth’; Kishori Pednekar criticizes Nitesh Rane
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाचा मोठा धक्का, बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती द्यायला नकार
- Punjab Elections : पंजाबमध्ये निवडणुका अन् हरभजनची निवृत्ती, चर्चा ‘भज्जी’च्या राजकीय इनिंगची, पण कोणत्या पक्षातून?
- आई वडिलांनी सोडून दिलेल्या ह्या जुळ्या भावंडाना पंजाब सरकारतर्फे नोकरी देण्यात आलीये
- तुकाराम सुपेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ ; सापडली ‘ इतक्या ‘ लाखांची रोकड