विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : डेंग्यूनी आजारी असणारे अजित पवार बरे झाले शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी पोहोचले त्याचे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले. नवी दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेल्याचे समजते.After meeting Sharad Pawar, Ajit Pawar to Delhi for Amit Shah’s meeting
अजित पवार डेंग्यूने आजारी होते त्यांच्या प्लेटलेट खूप खाली आल्या होत्या त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी विश्रांती घेतली त्यावेळी महाराष्ट्रात मराठा आंदोलन पेटले होते त्यामुळे त्या काळात आजारी असल्याने अजित पवार काहीही बोलू शकले नव्हते. काही काळाच्या विश्रांतीनंतर ते आता बरे झाले आहेत त्यामुळेच त्यांनी आज प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले.
विशेष म्हणजे, दरवर्षी गोविंदबागेमध्ये पाडव्याचा निमित्ताने पवार कुटुंबीयांची दिवाळी ही एकत्र होत असते. पण यावेळी घरातच दोन गट निर्माण झाल्यामुळे गोविंदबागेत पाडव्याला कोण कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे. या भेटीमुळे एकंदरच राजकीय तर्क वितरकांना चांगलेच उधाण आले.
गेल्यावेळी रक्षाबंधनाला एकत्र येण्याचे अजित पवारांनी टाळले होते. परंतू, अजित पवार हे शरद पवारांसोबत पुण्यात पवार कुटुंबाच्या दिवाळी स्नेहभोजनाला एकत्र आले होते. काका-पुतण्यामधील आलेले वितुष्ट दिवाळी दूर करते का??, असा प्रश्न उपस्थित होत असताना प्रतापराव पवारांच्या घरी नेमके काय घडले ते शरद पवारांची बहीण सरोज पाटील यांनी बाहेर पडताना सांगितले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली का??, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता सरोज पाटील यांनी कुटुंबाच्या गप्पा रंगल्या होत्या, असे सांगितले. आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे तातडीने दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मराठा ओबीसी धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक भेटीवर बोलायला जयंत पाटलांचा नकार
दरम्यान, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे हे त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मी काय बोलणार ? मी पार्टीचा प्रदेश अध्यक्ष आहे. पार्टीबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाला भेटावे याबद्दल मी बोलण्याचे कारण काय??, असा सवाल त्यांनी केला.
After meeting Sharad Pawar, Ajit Pawar to Delhi for Amit Shah’s meeting
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- जम्मू-काश्मीर : शोपियान चकमकीत TRF दहशतवादी ठार, दारूगोळा मोठ्याप्रमाणावर जप्त
- ”राहुल गांधी त्याच मंदिरात जातात जिथे बाबरचे…’ हिमंता बिस्वा सरमा यांचा जोरदार हल्लाबोल!
- ”अजून किती खालच्या पातळीवर जाल, जगभरात देशाला अपमानित करत आहात ” मोदींचा विरोधकांवर घणाघात!