प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पेट्रोलियम मंत्री, मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला होता, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांना जोडे मारा आंदोलन केले होते. आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिवसेना – भाजपच्या आमदारांनी त्याचेच अनुकरण करत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध जोडणारा आंदोलन केले. After Mani Shankar, join Rahul Gandhi’s agitation
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमानकारक उल्लेख केला. त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवार, २३ मार्च रोजी विधिमंडळात हा विषय चांगलाच पेटला आणि भाजपच्या आमदारांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध केला.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांनी जे जोडो मारो आंदोलन केले. त्यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार आशिष शेलार, आमदार योगेश सागर यांच्यासह अनेक आमदार हे राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत होते.
https://youtube.com/shorts/GZ7N0ps2QVY?feature=share
राहुल गांधी यांनी हिंदू नववर्षाच्या दिवशी ज्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला तो हिंदूंचा अपमान असल्याचे प्रसाद लाड म्हणाले. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाचा आदर केला, त्यासाठी लढा दिला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे म्हणजे हिंदूचा अपमान करणे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांना जोडे मारले आहेत. देशद्रोही राहुल गांधी यांनी देशाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी, ही आमची मागणी आहे, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.
आता जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे, त्यांना काहीही म्हटले तरी फरक पडत नाही. त्यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आदराबाबत कोणतीही अपेक्षा ठेवता येणार नाही. आता उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरेच म्हणावे लागेल, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.
After Mani Shankar, now Rahul Gandhi’s agitation
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!