• Download App
    मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा । Aditya Thakare will lead in Mumbai Corporation Election

    मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – गेली जवळपास ४० वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेली तीन निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. यंदा ही धुरा प्रथमच आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Aditya Thakare will lead in Mumbai Corporation Election

    फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी ही निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेऊन ज्युनियर ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतल्याचे सांगितले जाते. मुंबई महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयात आदित्य ठाकरे यांनी जातीने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या जोडीला विश्वासू नेते अनिल परब असतात.



    मागील निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. ही बाब ध्यानात घेत यावेळी भाजपला रोखण्यासाठी युवासेना आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या काम करत असल्याचे शिवसेनेतून सांगितले जाते. त्यामुळे मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्यात सत्तेत असताना मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. हे ध्यानात घेऊन आदित्य ठाकरे यांनी रणनीती आखण्यास सत्तेत सहभागी झाल्यापासून सुरवात केली आहे.

    Aditya Thakare will lead in Mumbai Corporation Election

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

    आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

    मी जे करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून नाही; अशोक खरात प्रकरणावर एकनाथ शिंदेंचे उत्तर