प्रतिनिधी
मुंबई : स्वतःलाच “पप्पू” म्हणून आदित्य ठाकरे यांनी आज शिंदे – फडणवीस यांना अंगावर येण्याचे आव्हान दिले!! Aditya thackeray called himself “pappu”; dared shinde fadnavis to take on him!!
मुंबई महापालिकेतील कोविड सेंटरच्या 12500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत ईडीने चौकशी आणि तपास सुरू करताच, ठाकरे परिवाराचे कान उभे राहिले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मुंबई महापालिकेवर आज मोर्चा काढला. या मोर्चात ठाकरे समर्थक शिवसैनिक हजारोंनी सामील झाले.
पण या शिवसैनिकांना संबोधताना आदित्य ठाकरे यांनी स्वतःलाच “पप्पू” म्हणवून घेतले. हा “पप्पू” तुम्हाला आव्हान देतोय, हिंमत असेल, तर अंगावर या!!, असे आदित्य ठाकरे या भाषणात म्हणाले. त्याचवेळी त्यांनी आमच्या शिवसेनेची सत्ता आली तर फायली घेऊन अधिकाऱ्यांच्या घरात घुसू आणि बुलडोझर चालवू, अशी धमकीही देऊन टाकली.
पण आदित्य ठाकरे यांनी या सर्व भाषणात स्वतःला “पप्पू” म्हणवून घेतल्याने त्यांच्या भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण आदित्य ठाकरे यांना कोणीच “पप्पू” म्हणत नाही. “पप्पू” हे राहुल गांधी यांना विरोधकांनी दिलेले “नामाभिधान” आहे. आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर “पेंग्विन” म्हणून चिडवले जाते. पण आदित्य यांनी आजच्या भाषणात “पेंग्विनचा” कुठेच उल्लेख केला नाही!!
त्या उलट स्वतःलाच “पप्पू” म्हणवून घेऊन आदित्य ठाकरे यांनी शिंदे – फडणवीस यांना आव्हान दिले. पण या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी आपलाच मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसला डिवचले. आता काँग्रेसचे नेते आदित्य ठाकरे यांच्या “पप्पू” भाषणावर काय प्रतिक्रिया देतात?, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Aditya thackeray called himself “pappu”; dared shinde fadnavis to take on him!!
महत्वाच्या बातम्या