• Download App
    दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे चौकशीच्या जाळ्यात; फडणवीसांचे आदेश|Aditya Thackeray under investigation in Disha Salian case; Fadnavis' orders

    दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे चौकशीच्या जाळ्यात; फडणवीसांचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान संशयास्पद मृत्यू प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास यंत्रणा एस आयटीला दिल्याची बातमी आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखालची एसआयटी आदित्य ठाकरेंची चौकशी करणार आहे.Aditya Thackeray under investigation in Disha Salian case; Fadnavis’ orders



    • फडणवीसांनी दिले आदेश

    दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी मागील काही काळापासून सातत्याने काही आमदार करत होते. याच मागणीची दखल घेत मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. आता लवकरच ही चौकशी सुरू केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

    •  आदित्य ठाकरे यांचा संबंध

    दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप अनेकदा भाजपाच्या आमदारांनी केले. दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी आदित्य ठाकरे नेमके कुठे होते??, त्यांचा नेमका ठाव ठिकाणा कुठे होता असा बोचरा सवाल अनेक आमदारांनी उपस्थित केला होता. असा प्रश्न उपस्थित भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी अनेकदा आदित्य ठाकरेंचा दिशा सालियान प्रकरणात हात आहे त्या संदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत असा दावा केला होता. आता याच प्रकरणात एसआयटी आदित्य ठाकरे यांची चौकशी करणार आहे त्यावेळी एसआयटीचे अधिकारी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याकडून पुरावे घेणार का?? आणि त्या पुराव्यांचे काय करणार??, असा सवाल तयार झाला आहे.

    • दिशाचा इमारतीवरुन पडून मृत्यू

    दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. पण दिशाची हत्या झाली असून आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती.

    •  6 दिवसांतच सुशांतचा संशयास्पद मृत्यू

    यानंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत हा त्याच्या वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. पण सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची ईडी चौकशी सुरू आहे. रिया ड्रग्स घेत होती. तिने सुशांतलाही ड्रग्जचे व्यसन लावल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने केला.

    • AU क्रमांकावरुन 44 फोन आल्याचा दावा

    सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला ‘AU’ नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावरुन 44 फोन कॉल आले होते. ‘AU’ चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे, असा आहे, असा आरोप करीत राहुल शेवाळेंनी लोकसभेत केला होता. या सगळ्या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

    Aditya Thackeray under investigation in Disha Salian case; Fadnavis’ orders

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस