• Download App
    Aditi Tatkare लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर

    Aditi Tatkare : लाडकी बहिण योजनेबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर अदिती तटकरे यांचा हल्लाबोल

    Aditi Tatkare

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Aditi Tatkare  महाराष्ट्रातील लोकप्रिय ‘लाडकी बहिण योजना’ बद्दल सध्या काही अफवांचा बाजार गाजत असा आरोप माजी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, काही चुकीच्या बातम्या आणि अफवा सध्या पसरवल्या जात आहेत ज्यात त्यांचे नाव अडकवले जात आहे.Aditi Tatkare



    तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “लाडकी बहिण योजना आमच्या सरकारने अत्यंत काळजीपूर्वक राबवली आहे आणि ती सुमारे 2 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त महिलांपर्यंत पोहोचली आहे.” त्याचसोबत, योजना सुरु झाल्यापासून, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    तटकरे यांनी स्पष्ट केले की, “जर काही महिलांना या योजनेसंबंधी तक्रारी आल्या, तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांचे निराकरण करण्यात येईल. विरोधकांकडून या योजनेवर सुरुवातीपासून टीका करण्यात आली, आणि त्यांच्या जाहीरनाम्यात ३००० रुपयांच आश्वासन दिलं ,लाडक्या बहिणींने ते ओळखले. तीनही भावांना निवडून दिलं त्यामुळे विरोधक आता काय बोलतायत त्याला काही अर्थ नाही

    Aditi Tatkare attacks those spreading rumors about Ladki Bahin Yojana

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल