• Download App
    Devendra Fadnavis ‘’नियमभंग करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई अटळ’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

    Devendra Fadnavis ‘’नियमभंग करणाऱ्या भोंग्यांवर कारवाई अटळ’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांनी केले स्पष्ट

    रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवणे बंधनकारक असल्याचेही सांगितले.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर भोंगे वाजवण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवणे बंधनकारक आहे. विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी दिली.

    तसेच, प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांसंदर्भात परवानगी आणि नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस निरीक्षकांवर असेल. तक्रारी आल्यानंतर कारवाई न झाल्यास त्या निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल.



    राज्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संरक्षण कायदा, 1986 आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम, 2000 लागू असून, दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.

    याशिवाय तक्रारींच्या आधारे पोलिस कारवाई करतील आणि संबंधित अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला जाईल. त्यानंतर, नियमानुसार मंडळाकडून संबंधित न्यायालयात खटला दाखल केला जाईल असे मुख्यमंत्री यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

    Action is certain against loudspeakers that violate the rules Chief Minister Fadnavis clarified

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस