• Download App
    आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्यासाठी केला महामृत्यूंजय मंत्रजापAcharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi

    आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान मोदींच्या दिर्घायुष्यासाठी केला महामृत्यूंजय मंत्रजाप

    आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.Acharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेतील त्रुटींमुळे एका उड्डाणपुलावर संतप्त शेतकऱ्यांनी मोदींचा ताफा रोखला आणि १५ ते २० मिनिटे उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे.

    त्याअनुषंगाने पंतप्रधाना दिर्घायुष्य लाभावे यासाठी भाजप अध्यात्मीक समन्वय आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी नाशिकमधील रामकुंडावरील बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती आणि महामृत्यूंजय मंत्रजाप केला.यावेळी आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



    तुषार भोसले म्हणाले की ,‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने शुक्रवारी सकाळी नाशिकच्या रामकुंडावर असलेल्या बाणेश्वर महादेव मंदिरात रुद्राभिषेक, आरती तसेच ‘महामृत्युंजय मंत्रजाप’ करण्यात आला.’ अशी माहिती तुषार भोसले यांनी दिली आहे.

    Acharya Tushar Bhosale chanted Mahamrityunjaya Mantra for the longevity of Prime Minister Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!