विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत ३ टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकच्या समस्येमुळे होत असल्याचा दावा अमृता फडणवीस यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की मी जे सांगते ते अहवाल पाहून सांगते. सर्वे मंकीने मुंबईमध्ये हा सर्वे केला होता. त्यात हे निष्कर्ष आले होते की घटस्फोटातल्या ३ टक्के प्रकरणांमध्ये वेळेत घरी पोहोचलो नाहीत, ट्रॅफिकमध्ये अडकलो, त्यामुळे घरी वेळ देऊ शकलो नाही अशी कारणं समोर आली.According to Amrita Fadnavis, 3% of divorces in Mumbai are due to traffic, its survey monkeys report
ट्रॅफिकच्या समस्येमुळे घटस्फोट होत असल्याचं विधान अहवालाच्या निष्कर्षांवर आधारित केल्याचे सांगून अमृता फडणवीस म्हणाल्या की, मी जे सांगते ते अहवाल पाहून सांगते. सर्वे मंकीने मुंबईमध्ये हा सर्वे केला होता. त्यात हे निष्कर्ष आले होते की घटस्फोटातल्या ३ टक्के प्रकरणांमध्ये वेळेत घरी पोहोचलो नाहीत, ट्रॅफिकमध्ये अडकलो,
त्यामुळे घरी वेळ देऊ शकलो नाही अशी कारणं समोर आली. मी त्याचाच आधार घेऊन बोलले. हा सर्वे मंकीचा सर्वे आहे ज्यात याचिका देखील दाखल झाली होती. शिवाय नेदरलँडमधली टॉम टॉम ही एक कंपनी आहे. या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत ४१ कोटींपेक्षा जास्त पैसा ट्रॅफिकमुळे वाया जात आहे. अशा रिपोर्ट्सपैकी एक मी सांगितला.
फडणवीस म्हणाल्या, मी मुंबईच्या माणसाची स्थिती सांगितली आहे. मी नागपूरची आहे. मला ट्रॅफिकची एवढी सवय नव्हती. पण आता मी २-३ तास ट्रॅफिकमध्ये घालवते. मी जे काही बोलले ते सर्वे मंकी आणि टॉम टॉम कंपनीच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बोलले. भाजपाचं राज्य नसलं तरी सगळे भाजपाचे सदस्य बाहेर आहेत. कुणी घरी दिसत नाहीत. माझं आणि भाजपाच्या बायकांचं हेच रडगाणं आहे की आमचे पती आम्हाला घरी दिसत नाहीत.
According to Amrita Fadnavis, 3% of divorces in Mumbai are due to traffic, its survey monkeys report
महत्त्वाच्या बातम्या
- पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या व्हायच्या गुप्त बैठका, देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचाच धक्कादायक खुलासा
- आता आणखी एक केजीएफ, राजस्थानच्या कोटडी भागात सापडली सोन्याची खाण
- सोशल मीडियावर आता अंकुश, गरज सभागृहात एकमत होण्याची गरज, अश्विनी वैष्णव यांची माहिती
- वाईन पिऊन महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी सरळ चालून दाखवावे; खासदार सुजय विखे पाटलांचे आव्हान!!