• Download App
    किरण गोसावी अखेर पुण्यात सापडला ।Absconded Kiran Gosavi in Pune Police custody

    किरण गोसावी अखेर पुण्यात सापडला

    शाहरूख खानचा मुलगा आयर्न खान याच्या ड्रग प्रकरणाशी संबंधित किरण गोसावी गेले काही दिवस फरार होता. त्याला अखेर पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे. Absconded Kiran Gosavi in Pune Police custody

    प्रतिनिधी
    पुणे : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेला व पुण्यासह अनेक शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेला किरण गोसावी अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात आला. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पकडले. तो लखनऊ येथे असल्याचीचर्चा होती.
    शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग प्रकरणी अटक झाल्यानंतर गोसावीने त्याच्या सोबतचे फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता.
    पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. मात्र तो फरार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढली. त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला जाऊन धडकले. परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून फरार झाला.


    याप्रकरणी चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावीने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.
    पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस गोसावीच्या मागावर होते.

    Absconded Kiran Gosavi in Pune Police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस