नवाब मलिक म्हणाले की, मनीष भानुशाली यांचे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो आहेत. मग आता मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील NCB ला स्पष्ट करावे लागेल.Aaryan khan Drugs Case: BJP’s Manish Bhanushali responds to NCP’s Nawab Malik’s allegations
विशेष प्रतिनिधी
मुंबई : NCB ने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेली कारवाई बनावट आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की अरबाझ मर्चंटला जो सोबत घेऊन गेला तो भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे. पुढे नवाब मलिक म्हटले की मनीष भानुशाली यांचे देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो आहेत. मग आता मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील NCB ला स्पष्ट करावे लागेल.
नवाब मलिक यांच्या आरोपावर भानुशाली यांच उत्तर
नवाब मलिक यांच्या टिकेला उत्तर देताना मनिष भानुशाली म्हणाले की, ‘मला ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. हा ड्रग्जचा विळखा तरूण पिढीला बरबाद करत आहे. या ड्रग्स पार्टी तील लोकं कोण आहे आणि या लोकांना पकडलं पाहिजे म्हणून मी NCB ला ड्रग्स पार्टी संदर्भात माहिती दिली. ड्रग्स पार्टी तील लोकांना पकडलं पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी ही माहिती NCB ला दिली. NCB ने कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कारवाई केली.’
नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही
‘मी त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई NCB ने केली आहे. मी फक्त NCB अधिकाऱ्यांसोबत चाललो होतो, मला जी माहिती मिळाली होती त्या माहितीची साक्षही नोंदवायची होती म्हणून मी सोबत गेलो होतो. देशहिताचं रक्षण करत काम मी केलं आहे.नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही’ असंही भानुशाली यांनी म्हटलं आहे.
Aaryan khan Drugs Case: BJP’s Manish Bhanushali responds to NCP’s Nawab Malik’s allegations
महत्त्वाच्या बातम्या
- कोल्हापूर मध्ये पुन्हा विकृत मानसिकतेचे कृत्य, भटक्या कुत्र्यांवर ओतले ऍसिड
- देशात वस्त्रोद्योगवाढीसाठी पीएम मित्रा योजनेला मंजूरी, टेक्सटाईल पार्क साठी ४४४५ कोटी रुपयांची तरतूद
- मोठी बातमी : रेल्वेने कर्मचाऱ्यांना दिली दिवाळी भेट, 11.56 लाख कर्मचाऱ्यांना मिळतील 78 दिवसांचा बोनस जाहीर
- कोरोना संकट : नगर जिल्ह्याची वाढली चिंता ! आणखी ८ गावांमध्ये जाहीर केला लॉकडाऊन