वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा शनिवारी साखरपुडा पार पडला. या जोडप्याने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अंगठ्यांची देवाणघेवाण केली. या आनंदाच्या क्षणाचे फोटो अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चढ्ढा यांनी शेअर केले आहेत. AAP leader Raghav Chadha and actress Parineeti Chopra’s engagement, CM-politicians and celebrities attended
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी त्यांच्या साखरपुड्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत फोटो क्लिक केले. सीएम केजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांची पत्नी गुरप्रीत कौर हेही फोटोत दिसत होते.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटचा पहिला फोटो समोर आला आहे. लग्नासाठी अभिनेत्रीने क्रीम रंगाचा सूट परिधान केला होता. दुसरीकडे, राघव चढ्ढा पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसले. परिणीती आणि राघव यांच्या एंगेजमेंटनिमित्त त्यांचे कुटुंब सेलिब्रेशनमध्ये दंग झाले होते.
चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा
अंगठ्यांची केली देवाणघेवाण
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राची कपूरथला हाऊसमध्ये एंगेजमेंट झाली. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना एंगेजमेंट रिंग्ज घातल्या.
कार्यक्रमाला व्हीआयपी पाहुणे
राघव चढ्ढा आणि परिणीतीच्या एंगेजमेंटला अनेक व्हीआयपी पाहुणे आले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, आदित्य ठाकरे, राजीव शुक्ला, अनुराधा प्रसाद, प्रियांका चतुर्वेदी, कपिल सिब्बल आणि त्यांची पत्नी प्रोमिला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत कपूरथला हाऊसमध्ये या जोडप्याच्या सोहळ्याला उपस्थित होते.
अतिथींसाठी लाइव्ह म्युझिक
बॉलिवूड दिवा परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटला आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी लाईव्ह म्युझिक ठेवण्यात आले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान परिणिती आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याला पोहोचले. भगवंत मान यांच्यासोबत त्यांची पत्नी गुरप्रीत कौरही या सेलिब्रेशनमध्ये पोहोचली होती. प्रियंका चोप्रा, मनीष मल्होत्रा, खासदार डेरेक ओब्रायन, संजीव अरोरा, विक्रमजीत साहनी, अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी आणि वकील राहुल मेहरा यांच्यासह सर्व पाहुणे जोडप्याच्या आनंदात सामील झाले होते.
AAP leader Raghav Chadha and actress Parineeti Chopra’s engagement, CM-politicians and celebrities attended
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कोण?? : ना सिद्धरामय्या, ना शिवकुमार; मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटक विजयाचे शिल्पकार!!; दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोर मोठे पोस्टर!!
- Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!
- IASच्या बदलीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
- सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!