प्रतिनिधी
नाशिक : हिंदू नववर्ष स्वागत महोत्सवानिमित्त नाशिक महापालिका आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी तीरावर “पंच परिवर्तन हेच समाज परिवर्तन” या संकल्पनेवर आधारित भव्य महारांगोळी साकारण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या उपक्रमातून स्वबोध, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण या पंचसूत्रीचा प्रभावी संदेश देण्यात आला. Sangh
– आठशे किलो रांगोळी 2200 किलो रंग
सुमारे १५ हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेली ही महारांगोळी तब्बल सव्वा दोनशे महिलांनी एकत्र येऊन साकारली. या भव्य कलाकृतीसाठी अंदाजे ८०० किलो रांगोळी व २२०० किलो रंगांचा वापर करण्यात आला असून, अवघ्या चार तासांत ही रांगोळी पूर्ण करण्यात आली. रंग, रचना आणि संदेश यांचा सुंदर मिलाफ साधत या उपक्रमाने उपस्थित नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले.
महारांगोळीचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ५ च्या नगरसेविका चंद्रकला धुमाळ आणि नीलम पाटील, प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेविका सौ. ठाकरे, सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे तसेच शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी तृप्ती देशपांडे यांच्या हस्ते प्रथम बिंदू रेखाटून करण्यात आला.
या प्रसंगी संस्कार भारतीचे अखिल भारतीय भू-अलंकरण प्रमुख रघुराज देशपांडे उपस्थित होते. रचनाकार निलेश देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदार्डे यांनी आभार मानले. आसावरी धर्माधिकारी यांनी सूत्रसंचलन केले.
सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन “वंदे मातरम्” गायले आणि त्यातून उत्साहात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमातून समाज प्रबोधनाचा विशेष संदेश देत नववर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
A Message of Social Transformation through a Five-Point Program in the Sangh’s Centenary Year
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी – एकनाथ शिंदे भेटीवरून नुसती पतंगबाजी; पण खरा राजकीय भूकंप अशा उघड भेटीतून घडतो का??
- ndia-US : भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार पुढे ढकलला; आता नवीन टॅरिफ स्ट्रक्चर तयार झाल्यानंतरच होणार
- ममता बॅनर्जींचे तृणमूळ काँग्रेसकडून एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर; पण स्वतः मात्र नंदीग्राम मधून लढायला घाबरल्या!!
- Kejriwal & Sisodia : केजरीवाल-सिसोदिया यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; मद्य धोरण प्रकरणात उच्च न्यायालयाच्या समन्सला आव्हान