• Download App
    Pune पुण्यातील बहाद्दराने चक्क दिल्लीला जाऊन भरला उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज !

    Pune : पुण्यातील बहाद्दराने चक्क दिल्लीला जाऊन भरला उपराष्ट्रपतीपदाचा अर्ज !

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सध्या देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत सतत काही ना काही चर्चा सुरूच आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही पुढील महिन्यात होणार असल्याने एनडीए व इंडिया आघाडी या दोघांनी आता आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या निवडणुकीसाठी चक्क पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या एका तरुणाने देखील अर्ज दाखल केला आहे. Pune



    माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर, इंडिया आघाडीने माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. परंतु दौंड तालुक्यातील सहजपूर गावात स्थित असणाऱ्या एका तरुणाने देखील या उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरत आहे. Pune

    उमेश म्हेत्रे असे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेशने दिल्ली गाठली आणि त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यसभेच्या दालनात असणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी पीसी मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे या तरुणाने हा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

    या आधीही भरलेला अर्ज?

    अशा प्रकारचा अर्ज भरण्याची उमेशची काही ही पहिलीच वेळ नाही. याआधीही उमेशने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या सह्या आवश्यक असतात त्या मिळवू न शकल्याने त्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. यावेळी देखील उमेश म्हात्रे याने उमेदवारी अर्ज दाखल केलेला असला तरी त्याचा हा ही अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात केवळ सीपी राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी हेच समोरासमोर येतील अशी शक्यता आहे. Pune

    संविधानामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींनुसार उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. कोणतेही सरकारी लाभ देणारे पद त्या उमेदवाराकडे नसावे.  तसेच तो सरकारी नोकरी करणारा देखील नसावा. उमेदवाराचे वय किमान 35 वर्षे पूर्ण असावे. या सोबतच उपराष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार हा राज्यसभा निवडणुकीसाठी देखील पात्र असणे आवश्यक असते.

    सीपी राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांसारखे अनुभवी आणि दिग्गज उमेदवार उपराष्ट्रपती पदासाठी असतानाही, पुण्यातील या तरुणाचा अर्ज स्वीकारला गेला तर ते आश्चर्यच म्हणावे लागेल. Pune

    A man from Pune went to Delhi to apply for the post of Vice President!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    vice president : आघाडीच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारावर नक्षलवादी कनेक्शन असल्याचा आरोप !

    Anjali Damania : कृषी घोटाळ्याप्रकरणी अंजली दमानियांचा गंभीर आरोप- धनंजय मुंडेंनी व्ही. राधांच्या रिपोर्टची फाइल गायब केली!

    Raj Thackeray : राज ठाकरेंचे फडणवीसांना आवाहन- अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा; माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? बुडणारी शहरं वाचवा!