विशेष प्रतिनिधी
पुसेगांव : हिंगोली जिल्ह्यातील पुसेगांव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच व भारतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी व उंच भगवान बाहुबलीची मूर्ती साकारण्यात येणार असुन ही मुर्ती तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. A magnificent Idol of Bahubali Created in Maharashtra
पुसेगांव येथील संभवनाथ दिगंबर जैन क्षेत्र या ठिकाणी राज्यस्थान येथील मूर्तीकारांच्या हस्ते ही मुर्ती तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे भगवान बाहुबलीच्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मूर्ती साठी एकूण अंदाजे दीड कोटी रुपये खर्च येणार असून पुसेगांव येथील जैन समाजाच्या लोकसहभागातून हे काम हाती घेण्यात आले आहे ही मूर्ती साकारण्यासाठी राजस्थान येथून पाषाण आणण्यात आला होता व सध्या राजस्थान येथील मूर्तिकारांच्या हस्ते मुर्ती कोरण्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती संस्थांनच्या वतीने देण्यात आली आहे.
- महाराष्ट्रात साकारतेय भव्य बाहुबलीची मुर्ती
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी मूर्ती ठरणार
- हिंगोली जिल्ह्यातील पुसेगांवमध्ये साकारणार
- पुसेगांवच्या संभवनाथ दिगंबर जैन क्षेत्रात काम
- भारतातील क्रमांक दोनची सर्वात मोठी मुर्ती
- राजस्थान येथून पाषाण आणण्यात आला
- राजस्थानचे मूर्तीकार कोरतायत मुर्ती
A magnificent Idol of Bahubali Created in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट, सतराव्या शतकातील राणी सेंट क्वीन केटवनचे पवित्र अवशेष सरकारला सोपविले
- नितीन गडकरी यांना हे शहर बनवायचे आहे भारताचे स्वित्झर्लंड, स्केइंगसाठी जगभरातून येतील पर्यटक
- राज ठाकरेंची आपल्या मूळ बालेकिल्ल्यावर पुन्हा नजर; १६ जुलैपासून ३ दिवस नाशकात मुक्कामी
- चूक काँग्रेस नेत्यांची; दोष बैलांच्या माथी…!!; महागाई विरोधी आंदोलनाची सोशल मीडियावर खिल्ली