• Download App
    छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी बाहेर काढला अफजलखानाचा कोथळा; प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार पुतळा!! A grand statue of Chhatrapati shivaji and Afzal Khan pratapgad

    छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी बाहेर काढला अफजलखानाचा कोथळा; प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार पुतळा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी काढला अफजलखानाचा कोथळा; शिंदे फडणवीस सरकार उभारणार प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा!! A grand statue of Chhatrapati shivaji and Afzal Khan pratapgad

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम सगळ्या जगाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीत महाराजांनी वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला अद्दल घडवली. या प्रसंगाची इतिहासात महत्वाची नोंद आजही कोट्यवधी शिवभक्तांना प्रेरित करते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा उभारण्यासाठी ‘हिंदू एकता आंदोलन, सातारा’ आणि इतर संघटनांनी विनंती केली होती.  हा पुतळा शिवप्रताप स्मारक म्हणून ओळखला जाईल.

    पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पर्यटन विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता हा पुतळा तयार झाला आहे. शिवरायांच्या पतुळ्याजवळ लाईट आणि साऊंट शोही सुरु करण्यात येणार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याजवळील अफजलखान कबरीजवळचे अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा देखावा असणारा छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

    महाराजांच्या पुतळ्याचे वैशिष्ट्य

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 13 फूट आहे, तर अफझलखानाच्या पुतळ्यांची उंची 15 फूट आहे. या पुतळ्याचं अंदाजे वजन 7 ते 8 टन आहे. हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 9 महिन्यांचा कालावधी लागला. शिल्पकार दीपक थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 कारागिरांच्या अथक मेहनतीतून हा पुतळा साकारण्यात आला आहे.

    A grand statue of Chhatrapati shivaji and Afzal Khan pratapgad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस