• Download App
    मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग ; कुठलीही जीवितहानी नाही , अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर|A fierce fire at a plastic godown in the Mandala area of ​​Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene

    मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊन भिषण आग ; कुठलीही जीवितहानी नाही , अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर

    आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.A fierce fire at a plastic godown in the Mandala area of ​​Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मानखुर्दच्या मंडाला परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला भिषण आग लागली.ही आग पहाटे तीनच्या सुमारास लागली आहे. दरम्यान स्थानिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. दरम्यान अग्निशमनदलाच्या १२ गाड्या घटनास्थळी हजर झाल्या.

    अग्निशमन दलाचे १५० जवान ही आग विझवण्याचे काम करत आहेत. या घटनेत कुठलीही जीवितहाणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.आग पसरल्यास या भागात मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

    दरम्यान मानखुर्द परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भंगाराचे गोडावून आहेत. तसेच या परिसरात लोकवस्ती देखील दाट आहे. नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

    A fierce fire at a plastic godown in the Mandala area of ​​Mankhurd; No casualties were reported, 12 fire trucks arrived at the scene

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर