• Download App
    पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत:च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा|A dose of advice to the people of Pune. Crowd in his own constituency, Home Minister Walse-Patil's program has a social distance fuss

    पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत:च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारीच (25 जून) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवत पुणेकरांना उपदेशाचे डोस पाजले. मात्र, आपल्या मतदारसंघात त्यांना सगळ्या नियमांचा विसर पडला. गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडाला.A dose of advice to the people of Pune. Crowd in his own constituency, Home Minister Walse-Patil’s program has a social distance fuss


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारीच (25 जून) पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवत पुणेकरांना उपदेशाचे डोस पाजले. मात्र, आपल्या मतदारसंघात त्यांना सगळ्या नियमांचा विसर पडला. गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडाला.

    रांजणगाव गणपती येथे दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असताना गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ फासला गेला.



    मागच्याच आठवड्यात पुण्यात राष्ट्रीवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी अजित पवार यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला. या सर्वांना अटक करुन जामीनावरही सोडण्यात आलं. ही घटना ताजी असतानाच गृहमंत्री मात्र, कोरोना नियम विसरले की काय असा प्रश्न निर्माण झालाय.

    शुक्रवारी खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसून, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय अस सांगत, नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं सांगितलं. मग दोनच दिवसात गृहमंत्र्यांना आपण काय बोललो याचा विसर पडला की हे नियम त्यांच्यासाठी नाहीत, अशी चर्चा आहे.

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत शुक्रवारी (25 जून) आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात या आठवड्यातही निर्बंध कायम ठेवले. ते म्हणाले होते, कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता या आठवडयातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील.

    जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करून पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे.

    A dose of advice to the people of Pune. Crowd in his own constituency, Home Minister Walse-Patil’s program has a social distance fuss

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस