बॉम्बची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षात अधिकारी हादरले. बॉम्ब निकामी पथक आणि जीआरपीच्या पथकाने घाईघाईने नमूद केलेल्या ठिकाणांचा शोध घेतला. A bomb planted at the residence of CSMT, Byculla station, Dadar and actor Amitabh Bachchan.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील पोलीस नियंत्रण कक्षात शुक्रवारी रात्री एक फोन आल्याने खळबळ उडाली. खरं तर, या फोन कॉल्सद्वारे, मुंबई पोलिसांना धमक्या दिल्या गेल्या की मुंबईत चार ठिकाणी म्हणजेच सीएसएमटी, भायखळा स्टेशन, दादर स्टेशन आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान बॉम्ब ठेवण्यात आले.
बॉम्बची माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षात अधिकारी हादरले. बॉम्ब निकामी पथक आणि जीआरपीच्या पथकाने घाईघाईने नमूद केलेल्या ठिकाणांचा शोध घेतला.
परंतु काहीवेळाने तपासात हा कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्याचवेळी, या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या CIU (क्राईम इंटेलिजन्स युनिट) ने दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिसांपुढे एका निनावी फोनमुळे आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली होती . रात्री ८ वाजून ५३ मिनिटांच्या सुमारास १०० नंबरवर बॉम्ब ठेवल्याबाबतचा फोन आला. या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले.
त्यानंतर माहितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्या नंबरवरून हा कॉल आला होता त्याच नंबरवर पोलिसांनी लगेचच संपर्क साधला तेव्हा “माझ्याकडे असलेली माहिती मी तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करू नका”, इतकंच सांगून त्या व्यक्तीने फोन ठेऊन दिला.
त्यानंतर त्या व्यक्तीशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला असून आता पोलिसांची डोकेदुखी त्यामुळे वाढली आहे.
अनोळखी फोनबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चारही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संबंधित ठिकाणी बॉम्बशोधक पथकं दाखल करण्यात आली आहेत. गेल्या काही तासांपासून हे सर्च ऑपरेशन सुरू असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या सर्च ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत.