विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलालनगर मधील खासगी होस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.Chhatrapati Sambhaji Nagar
आई-वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात ह्या मुलीने होस्टेल सोडले होते. वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याचे समोर आले. समाधान शिंदे, निखिल बोर्डे, प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे अशी संशयितांची नावे असून,त्यांना अटक करण्यात आले आहे. आणि न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील १७ वर्षीय मुलगी बन्सीलालनगरातील खासगी होस्टेलवर राहून नीटची तयारी करत होती. ती १२ वीत शिकते अभ्यासावरून आई- वडील रागावल्याने तिने गावाकडे जात असल्याची नोंद होस्टेलच्या रजिस्टरमध्ये करून ३० नोव्हेंबरच्या दुपारी एकला होस्टेल सोडले होते. मुलीने होस्टेल सोडल्यानंतर ती परभणीला गेली. तिथे रेल्वेस्टेशनवर तिला प्रदीप शिंदे भेटला. त्याने राहण्यासाठी जागा देण्याचे आमिष दाखवून सर्वात आधी बलात्कार केला. त्यानेच तिला पुसद येथे नेऊन सोडले. पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितनेही तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने बलात्कार केला.
त्यानंतर ती नाशिकला गेली. तिथे पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिला जेवण, राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने बलात्कार केला. नंतर मुलगी पुण्याला गेली.तिथे टॅक्सीचालक समाधानसोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. २ डिसेंबरला सायंकाळी तिचे वडील होस्टेलला तिला भेटायला आले असता मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले.तिच्या वडिलांनी तातडीने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक यादव यांना घटनेची माहिती दिली. यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचे कळताच पथकाने पुण्याला जाऊन तिचा शोध घेत ताब्यात घेतले. तिला छत्रपती संभाजीनगरला आणल्यानंतर तिचा जबाब नोंदवला तिने तिच्यावर झालेल्या बलात्कार सत्राची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे, संगीता गिरी, नामदेव सुपे यांची ३ पथके संशयितांच्या अटकेसाठी रवाना झाली. तिचे वडील कंपनीत कामगार आहेत. मुलीने रागाने होस्टेल सोडले, पण वासनांधांनी तिच्या असहायतेचा फायदा उचलला. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.
A 17-year-old girl was raped by 4 youths in Chhatrapati Sambhaji Nagar
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड