मुरझडी चिंच या गावातून चंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती.96 kg sandalwood seized in Yavatmal, one accused arrested
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावात आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या चंदनाची झाडे तोडून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली आहे.दरम्यान या कारवाईत ९५ किलो ७३० ग्रॅम चंदन अंदाजे किंमत सात लाख ६५ हजार रुपयांचे जप्त करण्यात आले.दरम्यान याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे
.तर एक आरोपी फरार झाला आहे.फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.दशरथ सूर्यभान नोगमोते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मुरझडी चिंच या गावातून चंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने आणि वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेताजवळ सापळा रचला.दरम्यान या शेतातून दोन व्यक्ती पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले.
पुढे वनविभाच्या व पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्या जवळील पोत्यातून ५१ चंदनाच्या झाडाचे तुकडे व चंदन झाडाचे बुंदे आढळून आले. याचे वजन केले असता ९५.७३० किलो चंदनचा साठा केला जप्त केला.जप्त केलेले चंदन ७ लाख ६५ हजाराचे असल्याची माहिती वनविभागाच्या फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले.
96 kg sandalwood seized in Yavatmal, one accused arrested
महत्त्वाच्या बातम्या
- चोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा
- कोरोना प्रतिबंधासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले आयुर्वेदिक उपाय…!!
- यूपीतली गळती रोखून भरतीसाठी अमित वाहनांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 10 तास मंथन; आजही पुन्हा बैठक!!
- WATCH : अमरावती पोलिसांच्या ताब्यामध्ये ५८ उंट कत्तलीसाठी राजस्थानातून तस्करीचा संशय