• Download App
    मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत|8 important decisions were taken in the cabinet meeting; Immediate assistance will be given to farmers affected by bad weather

    मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत करण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एनडीआरएफच्या नियमानुसार ही मदत दिली जाणार आहे.8 important decisions were taken in the cabinet meeting; Immediate assistance will be given to farmers affected by bad weather



    औरंगाबाद, जळगाव, नाशिकमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता; अवकाळीने शेतकरी धास्तावले

    राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्तपणे

    1. अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार ( मदत व पुनर्वसन)
    2. झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा ( गृहनिर्माण विभाग )
    3. राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा ( शालेय शिक्षण)
    4. मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार ( मराठी भाषा विभाग)
    5. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली ( अल्पसंख्याक विभाग )
    6. औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन ( उद्योग विभाग )
    7. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार ( महसूल विभाग)
    8. शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा ( महसूल विभाग)

    8 important decisions were taken in the cabinet meeting; Immediate assistance will be given to farmers affected by bad weather

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस