• Download App
    ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची पुण्यातील साडेआठ कोटी रुपयांची मालमत्ता इडी कडून जप्त|8 and a half crore assets of Tabut Inam Endowment Trust seized from ED in Pune

    ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची पुण्यातील साडेआठ कोटी रुपयांची मालमत्ता इडी कडून जप्त

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सक्तवसुली संचालनलयाने फसवणुक प्रकरणी ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टच्या (टिआयईटी) बॅंक खात्यातील दीड कोटी रुपयांची रक्कम व सात कोटी 17 लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट अशी आठ कोटी 67 लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली मंगळवारी जप्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज मोहम्मद प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.8 and a half crore assets of Tabut Inam Endowment Trust seized from ED in Pune

    टिआयईटी या ट्रस्टची बनावट कागदपत्रे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. त्याद्वारे “टिआयईटी’ च्या जमीनीच्या संपादनाविरुद्ध 8 कोटी 67 कोटी रुपयांचे मनी लॉंड्रींग प्रकरण पुढे आले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.



    त्यावरुन मुख्य आरोपी इम्तियाज मोहम्मद, हुसेन शेख, चांद रमजान मुलाणी, सतीश राजगुरु, संतोष कांबळे आणि इतरांनी संगनमत करुन फसवणुक केली होती. इशराक खान, झरीफ खान यांनी “टिआयईटी’ ट्रस्टची बनावट कागदपत्रे बनविली होती. या बनावट कागदपत्रांद्वारे “टिआयईटी’चे विश्‍वस्त असल्याचे दाखवुन संबंधित पदाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन ट्रस्टच्या नावाने बॅंकेत खाते उघडले होते.

    दरम्यान, या प्रकरणाचा तपास “ईडी’कडे गेल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर या प्रकरणामध्ये ट्रस्टच्या बॅंक खात्यामध्ये जमा असलेली दीड कोटी रुपयांची रक्कम, तसेच निवासी सदनिका खरेदी करण्यासाठी आणि वैयक्तीक लाभासाठी बॅंक खात्यात रक्कम वळती केली होती. त्यानुसार, दिड कोटी रुपयांची रोख रक्कम व 7 कोटी 17 लाख रुपयांचे निवासी अपार्टमेंट “ईडी’ने तात्पुरत्या स्वरुपात जप्त केले.

    8 and a half crore assets of Tabut Inam Endowment Trust seized from ED in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस