वृत्तसंस्था
मुंबई : मोदी 3.0 सरकारचा पहिल्या अर्थसंकल्पात बिहार, आंध्र प्रदेशवर निधीचा वर्षाव करण्यात आला, महाराष्ट्राला मात्र काहीच देण्यात आले नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. याचे कारण म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणात महाराष्ट्रासाठीच्या एकाही योजनेचा उल्लेख नव्हता. मात्र आणखी एक ’फेक नॅरेटिव्ह’ पसरू नये म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तत्काळ मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या वाट्याला काय- काय मिळाले याची यादीच जाहीर केली. यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या वाढत असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसह शहरी भागातील पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी देण्यात आल्याचा दावा फडणवीसांनी केला.600 crores for irrigation, 400 crores for roads in the state; Fadnavis announces provisions in Sitharaman’s budget
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना १० लाख रुपये तर अपघातात अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. यासाठी दरवर्षी १ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर केला. १ एप्रिल २०२४ पासून ही योजना लागू होईल. राज्यातील १२ लाख अंगणवाडी सेविका, ७५,५७८ अाशा स्वयंसेविका, ३६२२ गटप्रवर्तकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
जमिनी विकून पैसे देऊ का; अजितदादा मंत्र्यांवर भडकले
तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत. आम्हाला मतदारसंघाच्या विकासासाठी जादा निधी द्या, अशी मागणी करणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन, विजयकुमार गावित व शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चांगलीच कान उघाडणी केली. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, आता काय सरकारी जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का?’अशा शब्दात त्यांनी या मंत्र्यांना फटकारले. बैठकीस उपस्थित एका मंत्र्यानेच नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
निवडणुका तोंडावर असल्याने ७ महत्त्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे १ लाख कोटी रुपये खर्च होत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर आधीच बोजा असताना तुम्हाला जादा निधी द्यायचा कुठून?’ असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला. त्यावर हे तिन्ही मंत्री गप्प बसले. महाविकास आघाडीच्या सरकारमंत्री अर्थमंत्री असताना अजितदादा आम्हाला निधी देत नव्हते, अशी तक्रार करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र आता युती सरकारमध्येही त्यांना हाच अनुभव घ्यावा लागत आहे.
600 crores for irrigation, 400 crores for roads in the state; Fadnavis announces provisions in Sitharaman’s budget
महत्वाच्या बातम्या
- आधी अजितदादांचे स्वतंत्र करिअर सेटल करण्याची भाषा; आता पवारांना आरक्षण बचाव यात्रेचे निमंत्रण!!; बाळासाहेबांचे चाललेय काय??
- जम्मू-काश्मीरच्या बट्टल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला
- गावं, गरीब आणि शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प – पंतप्रधान मोदी
- आधी पवारांचे मुख्यमंत्र्यांशी गुफ्तगू; आता प्रकाश आंबेडकरांचे आरक्षण यात्रेत सामील होण्यासाठी पत्र!