विशेष प्रतिनिधी
पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून ई-वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ई-दुचाकी योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आता पालिकेकडून चार्जिंग स्टेशन योजना राबविण्यात येणार आहे. 500 charging stations will be set up by Pune Municipality
या आर्थिक वर्षात हा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, यंदाच्या अंदाजपत्रकातदेखील या योजनेचा समावेश केला आहे.सुमारे पाच हजारांहून अधिक ई-वाहने शहरात आहेत. मात्र, सध्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स नसल्याने वाहनधारकांना स्वत:ची व्यवस्था करून चार्जिंग करावे लागते.
चार्जिंगच्या या अडचणीमुळे अनेकजण ई-वाहनांचा वापर टाळतात. या पार्श्वभूमीवर आता महापालिका चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवर, रस्त्याच्या कडेला ५०० ठिकाणी ई-दुचाकी चार्जिंग स्टेशन खासगी सहभागातून बांधण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात येत आहे.
यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग आणि चार्जिंग स्टेशनचे भाडे मनपाला मिळणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना शहरामध्ये विविध ठिकाणी ई-दुचाकी भाड्याने उपलब्ध होणार आहेत. तर, खासगी ई-दुचाकीसाठी चार्जिंग स्टेशनदेखील उपलब्ध होणार आहेत. यामुळे ई-वाहन वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे
500 charging stations will be set up by Pune Municipality
महत्त्वाच्या बातम्या
- बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे आणि कुटुंबियांनी सुनेला दिली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या नावाने धमकी, मुलगा व्हावा याकरिता केले तंत्रमंत्र
- Dawood NCP Nexus : दाऊद – राष्ट्रवादी संबंधाची ही तर साखळी!!; सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनाही बनली दाऊद सेना!!
- कोयना अभयारण्यात रात्रीची जंगल सफारी; सातारा वन विभागाचा पर्यटनवाढीसाठी निर्णय
- राहुल कनालवरील छाप्यांमुळे शिवसेना नेते ; खुश!!; नितेश राणे यांचा ट्विटर द्वारे चिमटा!!