प्रतिनिधी
नागपूर : नागपूर येथे काल मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधला. 400 people safe from floods in Nagpur
त्यावेळी त्यांनी दिलेली माहिती अशी :
- काल मध्यरात्री 2 ते पहाटे 5 पर्यंत मुसळधार पाऊस झाला. एकूण पाऊस हा 109 मि.मी. पेक्षा अधिक होता. त्यातही अवघ्या दोन तासात 90 मि.मी. पाऊस झाला.
- पहाटेपासून मी स्वत: संपर्कात होतो. विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी अशी संपूर्ण टीम लगेच सज्ज झाली आणि त्यांनी प्रत्यक्ष प्रभावित भागात जाऊन स्थितीची माहिती घेतली, मदतकार्यासाठी सूचना दिल्या.
- एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या प्रत्येकी 2 तर लष्कराच्या दोन चमू तातडीने तैनात करण्यात आल्या. लष्कराची एक चमू वापरण्यात आली. तथापि सध्या दोन्ही चमू आपातकालीन स्थिती उदभवली, तर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
- आतापर्यंत 400 हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मूक-बधीर विद्यालयातील 70 विद्यार्थी, एलएडी कॉलेजमधील 50 विद्यार्थिनींनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले.
- आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. या पावसाने अंबाझरी, शंकरनगर, हजारीपहाड, नंदनवन, नागनदीला लागून असलेला परिसर प्रभावित झाला.
ऑरेंज अलर्ट असल्याने शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. - ज्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले, त्यांच्यासाठी तात्पुरते निवारे, जेवण इत्यादींची व्यवस्था करण्यात आली.
- या पावसात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. एकूण 14 जनावरे सुद्धा मृत्यूमुखी पडली.
- झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश तातडीने देण्यात आले असून, त्याला प्रारंभ सुद्धा करण्यात आला आहे. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
- आता परिस्थिती नियंत्रणात असून, प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका.
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी आणि इतरही टीम प्रत्यक्ष तेथे मदतीसाठी असून, मी स्वत: सायंकाळी नागपूर येथे जाणार आहे.
400 people safe from floods in Nagpur
महत्वाच्या बातम्या
- नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, शाळांना सुटी जाहीर; अंबाझरीसह गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने घरांमध्ये शिरले पाणी
- JDS एनडीएत सहभागी; अमित शहांना भेटल्यानंतर कुमारस्वामींची घोषणा, म्हणाले- आमची कोणतीही मागणी नाही
- लालू, राबडी, तेजस्वीसह 17 जणांना समन्स; लँड फॉर जॉब्स प्रकरणात 4 ऑक्टोबरला हजर राहावे लागणार
- बिधूडीने फिजूल हुसका दी है मक्खी; उत्तर प्रदेशच्या राजकारणात बसपाला ढकलले I.N.D.I आघाडीत!!