• Download App
    ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू । 4 died After Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra Thane

    ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू

    Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra : राज्यात कोविड सेंटरमध्ये आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव नाही. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर 20 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सहा रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले होते, यादरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला. 4 died After Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra Thane


    वृत्तसंस्था

    ठाणे : राज्यात कोविड सेंटरमध्ये आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव नाही. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी पहाटे अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर 20 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. आगीनंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या सहा रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले होते, यादरम्यान त्यातील चार जणांचा मृत्यू झाला.

    स्थानिक आमदार व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेची माहिती घेतली. ठाणे महानगर पालिकेने म्हटले की, बुधवारी पहाटे 3.40च्या सुमारास ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ठाणे महानगरपालिकेने या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

    ठाणे महानगरपालिकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविले जात असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. प्राथमिक चौकशीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती, मात्र यामागचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कदम यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण कळू शकेल. सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली की, रुग्णालयात आत 12 जण आहेत, परंतु येथे आल्यानंतर अधिक रुग्ण आढळले. आमची चौकशी सुरूच आहे. जर कोणी दोषी आढळले तर नक्कीच कारवाई केली जाईल.

    4 died After Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra Thane

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली