पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीशी वॉर्ड बॉयने गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या या तरुणीच्या बहिणीने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 25-year-old girl died at Pune’s Jumbo Covid Center, relative demands murder charge
प्रतिनिधी
पुणे : पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटर मध्ये २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. आपल्या बहिणीशी वॉर्ड बॉयने गैरवर्तणूक केल्याचा आरोप करत पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या या तरुणीच्या बहिणीने खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
ही तरुणी कोविड सेंटरमध्ये दाखल झाली तेव्हा पासूनच गंभीर स्थितीत आणि व्हेंटीलेटरवर होती. त्यांच्या परिस्थितीविषयी नातेवाईकांना आधीच कल्पना देण्यात आली होती. तसेच या नातेवाईकांनी जम्बोच्या वॉर्ड बॉयला मारहाण केली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून देखील नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे.
जम्बो रुग्णालयात एक माहिला उपचारांसाठी गेले काही दिवस दाखल होती. तब्येत बिघडल्याने व्हेंटीलेटरवर असलेल्या या महिलेचा मृत्यू झाला. मात्र या मृत्यूला जम्बो प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कोल्हापूर मध्ये पोलिस असणाऱ्या बहिणीने याबाबत पोलिस तक्रार दाखल करुन घेण्याचा आग्रह धरला आहे. आपल्या बहीणीशी वॉर्ड बॉयने गैरवर्तणूक केल्याचा आरोप या महिलेच्या भावाने केला आहे.
ही महिला १ तारखेला कोविड सेंटरमध्ये दाखल झाली तेव्हा पासूनच ती गंभीर होती. याची कल्पना नातेवाईकांना देण्यात आली होती असं स्पष्टीकरण महापालिकेच्या अधिकाºयांनी दिले आहे. नातेवाईकांनी वॉर्ड बॉयला मारहाण केली असा दावा करत जम्बो प्रशासनानेही नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
25-year-old girl died at Pune’s Jumbo Covid Center, relative demands murder charge
महत्त्वाच्या बातम्या
- Project Heal India : किरण खेर आजारी असुनही अनुपम खेर यांचा मदतीसाठी पुढाकार ; वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप अमेरिकेतून दाखल
- सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??
- कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; 22.4 टक्के वाढ
- महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस
- उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक