विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Devendra Fadnavis ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचं विक्रीचा साधन उपलब्ध व्हाव यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात मॉल तयार करणार आहोत.त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती दीदी असून मार्चपर्यंत पंचवीस लाख लखपती दीदी करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या “महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन – २०२५” चे उद्धघाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम,विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले , उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, उमेश चे मुख्य परिचलन अधिकारी परमेश्वर राऊत यांच्यासह राज्यभरातून बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ हा गेली २१ वर्ष अविरत सुरू असलेला उपक्रम आहे. उमेदवार अभियानाची प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे. ‘उमेदच्या’ माध्यमातून ‘महालक्ष्मी सरस’ हा राज्यभरात महिला बचत गटांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम झाला आहे.महिला बचतगटांची उत्पादने खूप चांगली असतात. पण यांच्या विक्रीसाठी खूप उपाययोजना कराव्या लागतात. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या परिसरात उमेद अभियानाच्या माध्यमातून मॉल उभारणार. यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. प्राथमिक स्तरावर दहा जिल्ह्यांत उमेद मॉल उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बचत गटांमार्फत तयार केलेली वस्तू ही खाजगी कंपनीच्या मालापेक्षा अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असून ती अत्यंत माफक दरात उपलब्ध होतात. उमेद च्या माध्यमातून ६० लाख पेक्षा अधिक कुटुंब आर्थिक प्रगती करत आहेत.या माध्यमातून बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लखपती दीदी‘ही योजना आणली आहे.ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना ‘लखपती दीदी’ म्हटले जाते.आज महाराष्ट्रात ११ लाख पेक्षा जास्त ‘लखपती दीदी’आहेत. मार्च २०२५ पर्यंत २५ लाख महिलांना ‘लखपती दीदी’ करणार आहोत.आगामी कालावधीत १ कोटी महिला लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. स्त्रीशक्ती ही आर्थिक विकासाला गती देणारी एक महाशक्ती होईल.बचत गटांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे.शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी,लाडकी बहिण योजना, एस. टी. मध्ये प्रवास सवलत यासह अनेक महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आहेत.लाडका भाऊ म्हणून लाडक्या बहिणींच्या विकासासाठी सदैव पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
25 lakh ‘Lakhpati Didi’ in the state by March Said CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Savitribai Phule ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेचे योगदान पर्यटन विभाग विसरला!
- जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, लक्ष्मण हाके यांचा आरोप
- Amanatullah Khan आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या अडचणी वाढल्या!
- Ranveer Allahabadia रणवीर अलाहाबादिया, समय रैना सह सर्वांना अश्लील कमेंट बद्दल राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; 17 फेब्रुवारीला दिल्लीत सुनावणी!!