वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई- गोवा, असा क्रूझ जहाजातून प्रवास करणे दोन हजारपेक्षा अधिक प्रवाशांना महागात पडले आहे. खालशांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच प्रवाशांना जहाजावरून गोव्यात उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली आली. 2,000 passengers stranded on Mumbai-Goa cruise ship; Annoyed by the sailor’s corona positive
खलाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता सुमारे दोन हजार प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर अहवाल काय येतो, हे पाहिल्यावर त्यांची सुटका होणार आहे. कॉर्डेलिया क्रूझची इम्प्रेस, असे जहाजाचे नाव असून सर्व प्रवासी मुंबई ते गोवा , असा प्रवास करत होते.
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की, खलाशी कोरोना पिझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्व प्रवासी कोरोनामुक्त झाल्याची खात्री होत नाही. तो पर्यंत त्यांना गोव्याच्या बंदरावर उतरण्यास मनाई केली आहे.
वास्को येथील सालगावकर मेडिकल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. त्यानंतर ते कोरोना निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना गोव्यात उतरू दिले जाईल. गोव्यात कोरोना संसर्ग फैलावला जाऊ नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे.
2,000 passengers stranded on Mumbai-Goa cruise ship; Annoyed by the sailor’s corona positive
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत
- जगाच्या शिखरावर उभारला पूल, तब्बल १९ हजार फुटावरून जाणारा सर्वात उंचीवरील रस्ता झाला सुरू
- विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या समितीत केवळ एकच महिला सदस्या
- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज