• Download App
    शासन आपल्या दारी योजनेत परभणी जिल्ह्यात 8.50 लाख लाभार्थींना 1500 कोटींचा लाभ!!|1500 crore benefit to 8.50 lakh beneficiaries in Parbhani district in its Dari scheme!!

    शासन आपल्या दारी योजनेत परभणी जिल्ह्यात 8.50 लाख लाभार्थींना 1500 कोटींचा लाभ!!

    प्रतिनिधी

    परभणी : शासन आपल्या दारी या लोककल्याणकारी उपक्रमाचा पुढचा टप्पा आज परभणी जिल्ह्यात पार पडला. यावेळी परभणी जिल्ह्यातील साडेआठ लाख लाभार्थ्यांना 1500 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यात आले.1500 crore benefit to 8.50 lakh beneficiaries in Parbhani district in its Dari scheme!!

    या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिवाजीराव डावरे आणि स्वातंत्र्यसैनिक पत्नी गयाबाई रेंगे यांना सन्मानित करण्यात आले.



    सर्वसामान्य नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात खेटे मारायला लागू नयेत यासाठी शासन आपल्या दारी हा अत्यंत लोकाभिमुख कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला असून त्यामाध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौरा यशस्वी करून जपानमधील जायका कंपनीकडून राज्यातील ३-४ प्रकल्पांसाठी सहकार्य मिळवण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन केले. तसेच परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

    देशाला पुढे घेऊन जायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नुकताच त्यांनी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांना ज्यापद्धतीने प्रोत्साहित केले ते कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सहाय्यानेच मराठवाडा वॉटर ग्रीड किंवा पश्चिम घाटाचे पाणी मराठवाड्यात वळवणे असे प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य होणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
    यावेळी व्यक्त केले.

    ऑनलाइन वरून लाईनवर

    विरोधकांनी त्यांच्यावर किंवा आमच्यावर टीका करण्याशिवाय एकही विधायक सूचना आजवर केलेली नाही. त्याना ऑनलाइन वरून लाईनवर आणण्याचे काम आम्ही केले आहे. यांचा भोंगा कायम वाईट बोलण्यासाठी वाजतो तो कधीही काही चांगले सांगत नाही. राज्यात होत असलेले शासन आपल्या दारीचे कार्यक्रम शिस्तबद्धरित्या पार पडत असल्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते फक्त टीका करत सुटले आहेत असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. सरकार जाण्याची भाकिते करून दमलेल्या विरोधकांनी आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू केल्या आहेत असे मत यावेळी व्यक्त केले.

     महिलांना शक्तीगट

    राज्यातील महिलांच्या बचत गटांना बळ देऊन त्यांना शक्तीगट बनवण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे जाहीर केले. परभणी शहरातील भूमिगत गटार योजनेसाठी अमृत योजनेतून ४०० कोटींची गरज आहे. रस्ते सुधारण्यासाठी ७० कोटी २१ लाख रुपयांचा जो निधी मंजूर झाला आहे त्यातून कामे सुरू होतील. शेलू तालुक्यातील एमआयडिसीसाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करूनच जमीन अधिग्रहण केले जाईल आणि नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना यासाठी नक्की निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली.

    याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार हेमंत पाटील, आमदार बाबजानी दुराणी, आमदार विप्लव बाजोरिया, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार सौ. मेघना बोर्डीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश वरपूडकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी खासदार सुरेश जाधव, माजी खासदार गणेश दुधगावकर, माजी आमदार हरीभाऊ लहाने, माजी आमदार हरिभाऊ आंबेगवकर, माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया, विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक श्रीमती राजसुधा आर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी सर, परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आणि जिल्ह्यातील सर्व सरपंच तसेच मोठ्या संख्येने आलेले लाभार्थी उपस्थित होते.

    1500 crore benefit to 8.50 lakh beneficiaries in Parbhani district in its Dari scheme!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस