• Download App
    ‘’१५ आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपा बरोबर जाणार’’ अंजली दमानियांच्या ट्वीटने चर्चांना उधाण!15 MLAs are going to be dismissed and Ajit Pawar will go with BJP Anjali Damania tweet sparks discussion

    ‘’१५ आमदार बाद होणार आणि अजित पवार भाजपा बरोबर जाणार’’ अंजली दमानियांच्या ट्वीटने चर्चांना उधाण!

    मागील काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांनी विविध मुद्य्यांवर मांडलेल्या भूमिकादेखील चर्चेचा विषय ठरलेला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आपल्या विविध विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांचं एक राजकीयदृष्ट्या खळबळजनक असं ट्वीट समोर आलं आहे. या ट्वीटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्यासंदर्भात दमानियांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे. 15 MLAs are going to be dismissed and Ajit Pawar will go with BJP Anjali Damania tweet

    ‘’आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपा बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची.’’ असं अंजली दमानिया यांनी ट्वीटमध्य म्हटलं आहे.

    याशिवाय मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्य्यांवर मांडलेल्या भूमिकाही चर्चेचा विषय ठरलेला आहे. ईव्हीएम मशीनविरोधात देशातील बहुतांश पक्षांनी आवाज उठवला आहे. मात्र अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. तसेच, गौतम अदानी प्रकरणी विरोधकांनी संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी केली आहे. शरद पवार यांनी मात्र परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानेही सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या.

    अद्याप सर्वोच्च न्यायालयात एकीकडे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. या खटल्यावर कोणत्याही क्षणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. अशावेळी जर निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर पुढे काय? भाजपाची आणखी कोंडी होणार का?, अशी चर्चा असतानाच भाजपाकडून आता बॅकअप प्लॅन तयार केला जातोय, असेही अंदाज लावले जात आहेत.

    15 MLAs are going to be dismissed and Ajit Pawar will go with BJP Anjali Damania tweet

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!