• Download App
    शिवसेनेचे 12 खासदार बंडळीच्या तयारीत; राष्ट्रपती निवडणुकीत दिसणार परिणाम??| 12 Shiv Sena MPs preparing for mutiny; Results to be seen in the presidential election ??

    शिवसेनेचे 12 खासदार बंडळीच्या तयारीत; राष्ट्रपती निवडणुकीत दिसणार परिणाम??

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार सुद्धा नाराज असल्याचे समोर आहे. हे 12 खासदार शिंदे गटात सामील होतील, असा दावाचा भाजपचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे. याचे परिणाम राष्ट्रपती निवडणुकीत ठळकपणे दिसतील, अशी शक्यता शिवसेनेचे सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक आहेत या बैठकीत काही ठोस निर्णय झाला तरच शिवसेनेच्या खासदारांचे बंड रोखले जाण्याची शक्यता आहे.12 Shiv Sena MPs preparing for mutiny; Results to be seen in the presidential election ??



    शिवसेना सध्या मोठ्या बंडाळीने ग्रस्त झाली आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये खासदारांचे दबाव तंत्र सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी राहुल शेवाळे, भावना गवळी या खासदारांनी केली आहेच. अशातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शिवसेनेचे 12 खासदार नाराज असल्याचा दावा केला आहे.

    शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार आहेत. शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विकासासाठी जनतेने निवडून दिले मात्र विकास न झाल्याने नाराज आहे, असा दावाचा तडस यांनी केला आहे.

    विकासच्या दृष्टीने लोकांनी खासदारांना निवडून दिले आहे. जर विकासच झाला नाही तर नाराजी राहते. त्यामुळे विकासच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, हिंदुत्व टिकवण्यासाठी 12 खासदार हे शिंदे गटामध्ये येणार आहे, असेही तडस म्हणाले.

    12 Shiv Sena MPs preparing for mutiny; Results to be seen in the presidential election ??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!

    ठाण्यात वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर कलम ३०७ ची कारवाई; एकनाथ शिंदे, राज ठाकरेंचा वृद्ध व्यक्तीशी संवाद

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क