• Download App
    महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन । 12% of the country vaccinated in Maharashtra !; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar

    महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

    वृत्तसंस्था

    पुणे : देशाने कोरोनाविरोधी लसीकरणाचा १०० कोटी डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्रात १० कोटींहून जास्त लसीकरण झाले आहे. पुण्यात १ कोटी १७ लाख लसीकरण झालं आहे. एकूण राज्याच्या तुलनेत १२ ते १३ टक्के लसीकरण केले. तर देशाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त महाराष्ट्रानं लसीकरण केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना होऊ नये, यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 12% of the country vaccinated in Maharashtra !; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar

    पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुण्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब आहे.



    ज्येष्ठानी अधिक काळजी घ्यावी

    दरम्यान, पुण्यात ज्येष्ठाना दुसऱ्या डोसनंतर कोरोना होण्याचे तुलनेनं जास्त आहे, असे सांगताना ते म्हणाले, “पुण्यात पहिल्या डोसनंतर ०.१९ टक्के व्यक्तींना कोरोना झाला तर दुसऱ्या डोसनंतर ०.२६ टक्के लोकांना लागण झाली आहे. त्यात ६०-६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाची अधिक काळजी घ्यावी.”

    12% of the country vaccinated in Maharashtra !; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pune Toxic : पुणे विषारी दारूकांडात मृतांचा आकडा १५ वर; मुख्य आरोपीसह ८ जण अटकेत, फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

    Chhagan Bhujbal : ‘आमच्यात कोणताही वाद नाही’; महायुतीतील जागावाटपावरून सुरू चर्चांदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र

    Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन पुन्हा पेटणार; मनोज जरांगे-पाटील उद्यापासून उपोषणावर, सरकारचे शिष्टमंडळ भेटीस