प्रतिनिधी
मुंबई – विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी महाविकास आघाडीने वादळी केले. गदरोळ, शिवीगाळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकरणावरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. त्याचे पडसाद आजही उमटले. या कारवाईच्या निषेधार्थ भाजपाने आधी विधिमंडळ परिसरात, तर नंतर पत्रकार कक्षात प्रतिविधानसभा भरवून सरकारवर टीकास्त्र डागले. तर सदनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याची परतफेड केली. यावेळी अगदी ईडीची विडी आणि तळायचे वडे इथपर्यंत भाषा वापरली गेली. 12 BJP MLA suspension; chagan bhujbal and devendra fadanavis targets each other one in vidhan sabha and other outside vidhan sabha
जरा काही केंद्र सरकार विरोधाच बोलायला गेले ईडीची विडी शिलगावतात, असा आरोप छगन भुजबळ यांनी सदनात केला. तर सगळीच जबाबदारी केंद्र सरकारची आहे, तर मग तुम्ही काय फक्त वडे तळायला बसलाय काय, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी अभिरूप विधानसभेत विचारला.
विधानसभेत छगन भुजबळ म्हणाले, की “दोन-चार दिवसांचे आंदोलन किती त्रासदायक असते. मग दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन आठ महिन्यांपासून सुरू आहे. ते दुश्मन आहेत का, ते पाकिस्तानातून आले आहेत का?,” असा सवाल त्यां नी उपस्थित केला.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे लागू केल्यानंतर ठाकरे सरकारने तीन कृषी विधेयक विधानसभेत सादर केली. या विधेयकावर बोलताना छगन भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात बोलायला लागले की लगेच ईडीची विडी शिलगावतात. ईडी चौकशीची आणि तपासाची धमकी देतात. दिल्लीतल्या लाखो शेतकऱ्यांच्या आंदोलनाची जगाने याची नोंद घेतली. आंदोलनाच्या ठिकाणी कोरोनामुळे आणि इतर आजारांमुळे दगावले. एकाचा मृत्यू झाला, तरी आपण संवेदना व्यक्त करतो. पण, २०० पेक्षा जास्त बळी गेला. पण, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्यांची दखल घेतली नाही. मंत्री नुसते यायचे, चर्चा करायचे आणि जायचे. शेतकऱ्यांनी भेटायला जायला म्हणून सांगितले, तर शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे ठोकले गेले. याची नोंद जगाने घेतली. टीका झाल्यावर खिळे काढले.
तर अभिरूप विधानसभेत बोलताना यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, की कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, पीक विमा, राज्याचे अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतील आरक्षण हे सर्व केंद्राने द्यावे. मेट्रोचे काम थांबले आहे, ते केंद्र सरकारने करावे. ठाकरे – पवार सरकार १०० कोटींची वसुली करणार, पण रेमडेसिविरसाठी केंद्र सरकार दोषी; ऑक्सिजन, ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसी केंद्र पुरवणार आणि तुटवड्याला केंद्र सरकार दोषी… जर सर्व केंद्र सरकार करत असेल, तर तु्म्हाला वडे तळायला बसवलेय का?,” अशी खरमरीत टीका फडणवीसांनी केली.
12 BJP MLA suspension; chagan bhujbal and devendra fadanavis targets each other one in vidhan sabha and other outside vidhan sabha
महत्त्वाच्या बातम्या
- सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक