कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईत आम्ही सोबत आहोत हे दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑ फ साऊथ वेल्सने आगळा वेगळा उपक्रम राबविला. या विद्यापीठाच्या लायब्ररीची इमारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्या रंगात उजळून निघाली होती. भारतीय विद्यार्थी, प्राध्यापकांना याद्वारे आम्ही तुमच्या सोबत आहोत, याचा संदेश देण्यात आला.Yes, we, along with India, lit up the University building in Australia in tricolor, conveying the message of a strong India.
विशेष प्रतिनिधी
सिडने : कोरोनाविरुध्दच्या भारताच्या लढाईत आम्ही सोबत आहोत हे दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्सने आगळा वेगळा उपक्रम राबविला.
या विद्यापीठाच्या लायब्ररीची इमारत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्या रंगात उजळून निघाली होती. भारतीय विद्यार्थी, प्राध्यापकांना याद्वारे आम्ही तुमच्या सोबत आहोत, याचा संदेश देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाचे उच्चायूक्त बॅरी ओ फॅरेल यांनी सांगितले की, आम्ही भारतीयांसोबत आहोत हा संदेश देण्यासाठी इमारत तिरंग्या रंगाच्या रोषणाईत न्हाऊन निघाली होती.
त्याचबरोबर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे फोटोही शेअर करण्यात आले. यावर भारतीय राष्ट्रध्वज फडकत होता. स्टे स्ट्रॉँग इंडिया (भारत बलशाली होओ) चा संदेश देण्यात आला होता.
आमच्या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीवर तिरंग्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती. कोरोना महामारीशी लढत असलेल्या आमच्या भारतीय मित्रांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले.
तुम्ही सर्व जण सुरक्षित राहावोत याच आमच्या शुभेच्छा असल्याचे विद्यापीठाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्वाड या चार देशांच्या गटाचे सदस्य आहेत.
दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाबरोबर शिखर बैठक केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये संवादाचे नवे पर्व सुरू झाले आहे. कोरोना संकटाच्या काळातही ऑस्ट्रेलियाने भारताला मदत सुरू केली आहे.
Yes, we, along with India, lit up the University building in Australia in tricolor, conveying the message of a strong India.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील २६ वर्षांच्या तरुणीकडून गरजू रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर
- जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा
- भारताविरोधी बातम्या देणार्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने खडसावले
- Cyclone Tauktae update : महाराष्ट्रात ४५२६, गुजरातमध्ये २२५८ मच्छिमार बोटी खवळलेल्या समुद्रातून किनारपट्टीवर सुरक्षित परतल्या