• Download App
    तालिबानी राजवटीचा खरा चेहरा होवू लागला उघड, महिला पत्रकारांना काम करण्यास मज्जाव Women journalist banned for working by Taliban

    तालिबानी राजवटीचा खरा चेहरा होवू लागला उघड, महिला पत्रकारांना काम करण्यास मज्जाव

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तू महिला आहेस, घरी जा, असे दटावत तालिबान्यांनी प्रसिद्ध महिला अँकर व पत्रकार शबनम दावरन यांना कार्यालयात येण्यापासून रोखले. रेडिओ टेलिव्हीजन अफगाणिस्तान (आरटीए) या सरकारी वाहिनीसाठी त्या काम करतात.

    शबमन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या आरटीए पाश्तो न्यूजसाठी काम करतात. व्हिडिओच्यावेळी त्यांनी हिजाब घातला होता. कार्यालयाचे ओळखपत्र दाखवीत त्यांनी सांगितले की, काम सुरु ठेवण्यासाठी मला कार्यालयात जायचे होते, पण मला प्रवेश नाकारण्यात आला. आता राजवट बदलली आहे. त्यामुळे तू काम करू शकत नाहीस असे मला सांगण्यात आले.



    आरटीएच्या आणखी एक महिला पत्रकार खदीजा यांनाही काम करण्यास मनाई करण्यात आले. खदीजा यांनी सांगितले की, मी कार्यालयापाशी गेले, पण मला आत जाऊ देण्यात आले नाही. तालिबानने नेमलेल्या नव्या संचालकांशी मी संपर्क साधला. आमच्या कामाबद्दल लवकरच निर्णय होईल असे तालिबानकडून मला सांगण्यात आले. आता कार्यक्रम बदलण्यात आले आहेत. तालिबान त्यांना हवे असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण करतात. एकही महिला सूत्रसंचालक किंवा पत्रकार कामावर नाहीत.

    दरम्यान, जलालाबाद येथे निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना तालिबान्यांनी क्रूरपणे मारहाण केली. त्यामुळे ते रडत होते. तेव्हाचा व्हिडिओ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे पत्रकार हफीझुल्लाह मारूफ यांनी पोस्ट केला आहे. मारूफ म्हणतात की, केवळ एका मोर्चाचे वार्तांकन करताना पत्रकारांवर अशी वेळ आल्याचे पाहणे ह्रदयद्रावक आहे. आता अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांना अशी मारहाण होत असून तालिबानकडून अशी वागणूक दिली जात आहे.

    आणखी एका व्हायरल व्हिडिओनुसार एक तालिबानी एका महिला पत्रकाराला लाथ मारताना आणि तिच्या अंगावर उभा राहात असताना दिसते. त्यावेळी ती महिला वेदनेने कळवळत होती.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार