• Download App
    निर्वासितांच्या नावाखाली आमच्या देशात दहशतवादी नकोत - पुतीन We don’t want Afghan terrorist in oir country - putin

    निर्वासितांच्या नावाखाली आमच्या देशात दहशतवादी नकोत – पुतीन

    विशेष प्रतिनिधी

    मॉस्को – अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियातील देशांत तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवण्याच्या पाश्चात्त्य देशांच्या निर्णयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टीका केली आहे.  रशियाच्या सुरक्षिततेविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. We don’t want Afghan terrorist in oir country – putin

    रविवारी त्यांनी युनायटेड रशिया या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, पाश्चात्त्यांचा दृष्टिकोन अपमानास्पद आहे. मध्य आशियाई देश आणि रशिया यांच्यातील करारानुसार व्हिसाचे कोणतेही निर्बंध नाहीत.



    त्यामुळे निर्वासितांच्या नावाखाली दहशतवादी आमच्या देशात येण्याचा धोका आहे. १९९० आणि दोन हजार या दशकांच्या मध्यास झालेल्या प्रकारांची आम्हाला थोडी सुद्धा पुनरावृत्ती नको आहेत. त्यावेळी उत्तर कॉकेशस प्रांतात अस्थिरता आणि शत्रु़त्व निर्माण झाले होते.

    अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान या देशांत हजारो नागरिक जमले आहेत. मायदेशातून बाहेर पडण्यास ते अधीर झाले आहेत.

    We don’t want Afghan terrorist in oir country – putin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    David Eby : भारत-कॅनडा संबंध सुधारल्याने खालिस्तान समर्थक चिडले; बीसी प्रीमियर डेवी एबी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त

    Trump : ट्रम्प म्हणाले- मेक्सिकोवर ड्रग कार्टेल्सचे राज्य:जमिनीवरील हल्ल्यांनी त्यांना संपवू; मेक्सिकोच्या अध्यक्षा म्हणाल्या- अमेरिका कोणाचाही मालक नाही

    Canada : कॅनडा सरकारचा पंजाबी लोकांना मोठा धक्का; ज्येष्ठांच्या पीआरवर 2028 पर्यंत बंदी; केअरगिव्हर कार्यक्रमही थांबवला