• Download App
    दुटप्पी पाकिस्तानमुळेच अफगणिस्तानात तालिबानला इतके यश, अमेरिकेला अखेर झाली उपरती |US targets Pakistan for supporting taliban

    दुटप्पी पाकिस्तानमुळेच अफगणिस्तानात तालिबानला इतके यश, अमेरिकेला अखेर झाली उपरती

    विशेष प्रतिनिधी 

    वॉशिंग्टन  :अफगाणिस्तानमधील युद्धात पाकिस्तानने दुटप्पी धोरण अवलंबले. पाकिस्तानने विचित्र भूमीका घेत तालिबानच्या यशात मोठे योगदान दिले असल्याचे अमेरिकेतील ज्येष्ठ सिनेटर जॅक रीड यांनी म्हटले आहे.US targets Pakistan for supporting taliban

    त्यांच्या मते दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेशी हातमिळविणारी करणारा पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला दहशतवाद्यांना थेट लष्करी आणि आर्थिक साह्य करत होता.सिनेटमधील आपल्या भाषणात जॅक रीड यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले.



    ते म्हणाले,‘‘तालिबानला पाकिस्तानात मिळत असलेला आश्रय दूर करण्यात अमेरिका सरकारला आलेले अपयश हा तालिबानच्या यशातील मोठा घटक आहे. पाकिस्तानमध्ये तालिबानच्या कारवायांकडे दुर्लक्ष केले जाते आणि आयएसआय ही सरकारी गुप्तचर संस्थाच तालिबानला पाठबळ देते.

    हा धोका माहित असूनही त्याला फारसे महत्त्व न देणे ही अमेरिकेची कदाचित सर्वांत मोठी चूक ठरली आहे.अफगाणिस्तानातून ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी घेणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले असल्याच्या पार्श्वभूमीवर रीड यांनी सिनेटमध्ये त्यांची भूमिका मांडली.

    US targets Pakistan for supporting taliban

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या